fbpx

मा. गो. वैद्य यांच्या स्वीय सहायकाच्या संदर्भात

ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते माननीय मा. गो. वैद्य यांच्याशी आपले फार जवळचे संबंध होते, असे आपले महत्त्व वाढविण्यासाठी, जिथे तिथे आणि ज्याला त्याला सांगत सुटणारा एक पत्रकार त्यांच्या संदर्भात अत्यंत चुकीची माहिती लोकांमध्ये प्रस्तुत करीत असतो.

मा. गो. वैद्य आमदार असताना आपण त्यांचे स्वी य सहायक होतो, असे तो सांगत असतो. स्वनामधन्य असलेल्या या तथाकथित पत्रकाराचे हे असे नेहमी सांगत सुटणे किती खोटे आहे किंबहुना हा पत्रकार किती दांभिक आणि खोटारडा आहे, हे मी आता पुराव्यासह जाहीर करीत आहे.

वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांचा स्वीय सहायक मीच होतो. त्यांनी तसे लेखी पत्र मला आणि
१) Office Incharge Treasury, Nagpur. 2) Secretary, Maharashtra Legislature Secretariat vidhan bhavan, Bombay-21.

दि. २१ – ११ – १९८१ रोजी लिहिले होते. माझ्याजवळ असलेल्या त्या पत्राचीच झेरॉक्स प्रत मी आता खाली प्रकाशित करीत आहे.

अरेरे, मा. गो. ऊर्फ बाबूरावांशी संबंध दाखविणाऱ्या या प्रसिद्धिलोलुप आणि स्वाभिमानशून्य पत्रकाराने इतके खोटारडे बोलावे, ही किती शरमेची आणि विनोदी बाब आहे.

श्यामकांत रामकृष्ण पात्रीकर
ज्येष्ठ पत्रकार

Like, Share and Subscribe

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *