ग्राहकतीर्थ स्मृतिदिन सप्ताहात ‘नॅशनल वेब मीडिया’ वर २५ हजार ‘व्हिवर्स’ ची हजेरी
ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायतचे संस्थापक – अध्यक्ष, ग्राहकतीर्थ मा. बिंदुमाधव जोशी यांचा स्मृतिदिन १० ते १६ मे २०२० दरम्यान ‘नॅशनल वेब मीडिया’ तर्फे आयोजित या प्रसारणात संघटनेच्या मान्यवरांनी कार्यकर्त्यांना प्रबोधनाद्वारे मार्गदर्शन केले. या प्रसारणाचा जवळपास २५ हजारावर ‘व्हिवर्स’ने लाभ घेतला, हे येथे नमूद करताना आम्हाला अत्यानंद होत आहे.
‘नॅशनल वेब मीडिया’च्या विविध प्लॅटफॉर्म म्हणजे – युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आदी वर – ‘ग्राहकतीर्थ स्मृतिदिन सप्ताह’ प्रबोधन कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले आहे. त्यात जवळपास २५ हजारावर व्हीवर्सने हजेरी लावली. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, कलकत्ता या सर्व सर्कलमधील व्हीवर्सची ही प्रत्यक्ष निदर्शनास आलेली आकडेवारी आहे. ‘नॅशनल वेब मीडिया’ची या सर्व सर्कलमधील व्हीवर्सची एकूण संख्या जवळपास ७५ हजारावर आहे, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नाशिक विभागीय अध्यक्ष श्री. मार्तंडराव उपाख्य बाबासाहेब जोशी, धुळ्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. योगेश सूर्यवंशी, राज्य अध्यक्ष डॉ. विजयराव लाड, राज्य सहसंघटक सौ. मेधाताई कुलकर्णी, विदर्भ संघटक डॉ. कल्पनाताई उपाध्याय, विदर्भ अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर व राज्य सचिव अरुणजी वाघमारे आदी मान्यवरांनी कार्यकर्त्यांना प्रबोधन, मार्गदर्शन करून ग्राहकतीर्थ मा. बिंदुमाधव जोशी यांना आदरांजली वाहिली.
वरील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेऊन सहभाग घेतला, त्याबद्दल त्यांचे ‘नॅशनल वेब मीडिया’ आभारी आहे.