fbpx

नितीन राऊत यांच्याविरोधात पोलीस तक्रार

ऊर्जा मंत्र्यांची वीज कंपनीच्या पैशावर मौज

Like, Share and Subscribe

मुंबई : १६ मार्च – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर कारमायकल रोड प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना झालेली अटक आणि त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आलेले असताना आता राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊतही अडचणीत आलेले आहेत. याचं कारण आहे भाजपचे माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक यांनी राऊत यांच्या विरोधात आता मुंबईतील निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

एकीकडे राज्याची कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती अडचणीत असताना उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी बेकायदेशीरपणे राज्य सरकारचं चार्टर्ड विमान वापरलं, असा आरोप पाठक यांनी केला आहे. इतकंच नाही तर हे विमान वापरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची रितसर परवानगी लागत असते, मात्र अशी कोणतीही परवानगी राऊत यांनी घेतली नसल्याचाही आरोप पाठक यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीकडे केला आहे.

मागील वर्षी ऐन कोरोनाच्या काळात राज्यापुढे आर्थिक परिस्थिती अडचणीत असताना जुलै महिन्यात राऊत यांनी दिल्ली, हैदराबाद, औरंगाबाद, नागपूर, मुंबई असा चार्टर्ड विमानाने प्रवास केला होता आणि या हा सगळा प्रवास खासगी होता, यात सरकारी कामाचा कोणताही सहभाग नव्हता असाही आरोप पाठक यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. इतकंच नाही तर राऊत यांनी सरकारी कंपन्यांवर दबाव टाकत ही बिलं भरायला लावलीत, असा आरोपही पाठक यांनी आपल्या तक्ररीत केला आहे.

या सगळ्या प्रकरणात मुळात मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराला बगल देत राऊत यांनी परस्पर विमानाचा वापर केला आहे तसंच बेकायदेशीरपणे सरकारी कंपन्यांना आपली बिलं राहायला लावली आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात आयपीसी 406, 409 कलमांच्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी पाठक यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी तर या प्रकरणी राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पाठक यांनी केली आहे. तसं न झाल्यास आपण मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करुन न्यायालयीन लढाई सुरुच ठेवू, असा इशारा सुद्धा पाठक यांनी दिला आहे. एकीकडे वीज बिलं न भरल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांची वीज कापली जात आहे पण सरकारी पैशांचा अपव्यय करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई होणार का? असा सवाल पाठक यांनी विचारला आहे.

Like, Share and Subscribe

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *